आज व्हिडीओ का नाही बरं ?

आज शनिवार, मी तुम्हाला विडिओ पाठवायचे आणि तुम्ही ते बघायचे हा 9 शनिवार चाललेला आपला नित्यनेम.
आज मात्र मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. काही प्रश्न विचारणार आहे,काही मनमोकळं सांगणार आहे.
चला तर मग

प्रश्न पहिला,तुम्ही रोज आंघोळ करता ना?तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे. आंघोळ न चुकता करतो.

दुसरा प्रश्न घरातील कचरा रोज काढता ना.
हो रोज काढतो, कधी 1,2 दिवसांनी काढतो. घर साफ ठेवतो.

आपलं शरीर ,आपलं घर नियमित स्वच्छ करणारे आपण, मनाची स्वछता करतो का.? स्तब्ध झालात ना.
मनाची स्वछता ती कशासाठी, आणि का करायची, असा प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
नीट विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्या छोट्यात छोट्या तसेच एकदम मोठ्या इच्छा,आकांशा,स्वप्न ह्यांचा जन्म मनात होतो. त्या पूर्ण करण्यासाठी आपण अविरत झटत असतो. स्वप्न पूर्ती नंतरचा आनंद ही त्याच मनात साठवतो आणि अनेक दुःखद आठवणी ही त्याच मनात जपून ठेवतो.
आपल्या अनुभवातून जन्माला येणाऱ्या ह्या भावना आपले विचार,दृष्टीकोन,विचारधारा घडवत राहतात.
आपली विचारधारा,दृष्टीकोन,भावना ,विचार करण्याची पद्धत आपल्या साठी योग्य आहे की अयोग्य आहे?
नकारात्मक विचार करू नका म्हणजे काय करा?
नको असलेले विचार कसे काढून टाकता येतील ?
सकारात्मक विचार कसे आत्मसात करायचे ?
ह्या सर्वाचा त्रयस्थपणे मागोवा घेणं म्हणजेच आपण मन स्वच्छ करण.
चांगलं पीक येण्यासाठी ज्याप्रमाणे शेतकरी पहिल्यांदा नको असलेले तृण काढून टाकतो त्याच प्रमाणे मनाचीही मशागत करण आवश्यक आहेच.

मनाशी सवांद करायला हवा याची जाणीव सर्वांना व्हावी, तसच हसत खेळत गोष्ट ऐकत सहजपणे meditation च्या माध्यमातून मनाशी सवांद साधण्याची सहज सोपी शृंखला
Talk with your Happiness या नावाने मी सुरू केली आहे.
ह्याचा कालावधी 30 ते 40 मिनिटांचा आहे. स्वःताकरिता इतका वेळ तर आपण नक्कीच काढू शकतो. किंबहुना तो आवर्जून काढायला हवा. आणि रोज ह्यातील एक तरी meditation झोपताना, अथवा तुमच्या सोई नुसार करा
आजपर्यंत साधारणपणे 9 भागात स्वःतावरचा राग, भीती, निराशा, स्वःताची क्षमता, जबाबदारी,नातेसंबंधातील संवाद,परिस्थिती चा स्वीकार,पूर्वग्रह,विचारांमधील अस्पष्टता इतके विषय हाताळून झाले आहेत.
सहज म्हणून सुरू केलेल्या ह्या series ला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल मी खूप आभारी आहे.
तुमच्या पैकी काही जणांनी सुचविल्याप्रमाणे आता 8वी ते 10 वी च्या मुलांकरिता अशीच series सुरू करत आहे तसेच मराठीतुन असणारी ही मेडिटेशन्स हिंदी माध्यमातून आणणार आहे.या सगळ्यालाही तुम्ही असाच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.तुम्हाला ही series कशी वाटली हे नक्की सांगा.अजूनपर्यंत बघितली नसेल तर जरूर पहा.
तुमच्या काही सूचना असतील, अजून कुठले विषय घ्यावेत असं वाटत असेल तर जरूर मला वैयक्तिकरित्या कळवा.
Talk with your Happiness अर्थात तुमच्या आनंदाशी तुमचा संवाद(मराठी)-एकूण 9 भाग

YouTube Channel Subscribe करायला विसरू नका