Talk with your Happiness S02- (Teenagers) E08 – विचारांचा ठामपणा (13 वर्षावरील मुलांसाठी)

औरंगाबाद येथून *योगशिक्षिका आणि तत्त्वज्ञानाच्या पदवीधर
प्रतीक्षा कुलकर्णी

नमस्कार,
वृषाली लेले यांनी सुरू केलेली Talk with your Happiness ही लहाना-मोठ्यांसाठी असलेली मालिका मी नियमित ऐकत आहे. आपल्या मनाशी व शरीराशी आपला संवाद सातत्याने असणे गरजेचे आहे. हे मला या मालिकेमधून ठळकपणे जाणवले . माझ्या योगवर्गात शिकवत असताना ध्यानाच्या वेळी मी काही जणांना वरील मालिकेतील काही भाग बघून मेडिटेशन करण्यास सांगितले. त्यांना ह्या मेडिटेशन मधून अतिशय उत्तम अनुभव मिळाला.
ध्यानाच्या माध्यमातून आपण शरीराशी व मनाशी संवाद साधु शकतो. योग आणि हिलींग हे समान गोष्टींवर आधारित आहेत.
सर्वेतु सुखीन: सन्तु
सर्वे सन्तु निरामया:।
सर्वे भद्राणी पश्यन्तु
मा काश्चित् दुःख भाग् भवेत् ।।
हा त्यांचा समान आधार आहे.
स्वतः मधील ऊर्जेचा व वैश्विक ऊर्जेचा समतोल साधून स्वतःचा विकास साधणे शक्य होते. ज्याप्रमाणे योग मध्ये सात चक्रांच महत्व आहे त्याच प्रमाणे Talk with your Happiness मधील हिलींग मध्ये आपल्या शरीरातील सात ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित मनाला शांती मिळवून देतात.

धन्यवाद.
प्रतीक्षा कुलकर्णी

आणि हो Subscribe करायला विसरू नका